न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०१९) :- दिव्या फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील दिग्गजांचा सन्मान होणार आहे. या सन्मान सोहळ्यात उद्योजक संतोष बारणे यांना ‘दिव्यरत्न जीवनगौरव पुरस्कार २०१९’ हा विशेष पुरस्कार संस्थेच्या वतीने जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार (दि. २९) रोजी दुपारी ०१.०० वा. पुण्यातील मालधक्का येथील डाँ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे संपन्न होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील इतर मान्यवरांनाही पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली.












