न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०१९) :- स्मार्ट सिटी मिशनचे सेक्रेटरी संजय शर्मा यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस भेट दिली. दरम्यान स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या शहरातील विविध विकासकामांना भेटी दिल्या.
त्यांनी वाय. सी. एम.रुग्णालयाच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची तसेच पिंपळे सौदागर येथील रस्त्यांची व इंद्रधनुष्य सायकल प्रकल्पांची पहाणी केली. याप्रसंगी त्यांच्या समवेत पिंपरी चिंचवड महापालिकेचे माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमन, अन्य अधिकरी व कर्मचारी आदी उपस्थित होते.












