न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०१९) :- शहर विकासासाठी पदाधिकारी, नगरसेवक व नगरसेविकांच्या येणा-या सूचना विचारात घेऊन विकास कामे करण्यासाठी अधिका-यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना महापौर राहूल जाधव यांनी दिल्या.
प्रभागस्तरावरील अडचणी व विकास कामांबाबतच्या आढावा बैठकांचे आयोजन सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये त्यांनी केले असून, आज ब प्रभागाची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला ब प्रभाग अध्यक्षा करूणा चिंचवडे, नगरसदस्य बाळासाहेब ओव्हाळ, नामदेव ढाके, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, नगरसदस्या प्रज्ञा खानोलकर, संगीता भोंडवे, मोनाताई कुलकर्णी, अश्विनी चिंचवडे, निता पाडाळे, उषा काळे, स्वीकृत सदस्य अँड. मोरेश्वर शेडगे, प्रभाग समिती स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, बिभीषण चौधरी, शहर अभियंता राजन पाटील, सहाय्यक आयुक्त संदिप खोत, कार्यकारी अभियंता एकनाथ पाटील, चंद्रशेखर धानोरकर, मुख्यउद्यान अधिक्षक सुरेश साळुंके, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे, माहिती व जनसंपर्क विभागाचे वरिष्ठ लिपिक रमेश भोसले आदि उपस्थित होते.
यावेळी कचरा वेळच्यावेळी उचलणे, कचरावाहतूक गाडया वाढविण्यात येणे यावर चर्चा झाली. विसर्जन घाटावरील कामकाज पुर्ण करणे, स्मशानभूमी, स्मशानघाटाचे कामकाज पुर्ण करणे, मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, पाणीपुरवठा सुरळीत होणे, रस्त्यावरील खड्यांची डागडुजी करणे,
प्रभागातील अतिक्रमणे त्वरित काढणे, भाजीमंडई स्वच्छ ठेवणे प्रभागातील बीआरटीएस वाहतुक ताबडतोब चालू करणे, चाफेकर पुतळयासमोरील पूलाखालील अतिक्रमण त्वरित हटवणे, काळेवाडी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविणेबाबत सूचना केल्या. यासह विविध विकास कामांवर चर्चा झाली.












