न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०१९) :- रहाटणीतील क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले एजुकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला तात्या शिनगारे, सुरेश भालेराव (मा.पोलिस अधिकारी), योगेश शिनकर, अर्पण सूर्यवंशी, मुख्याध्यापिका श्रीविद्या रामेश व संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार उपस्थित होते. सुरेश भालेराव (मा. पोलिस अधिकारी) यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षक, इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार म्हणाले की, ”आपण सर्वजण कोणाचे तरी शिष्य आहोत. या भावनेने एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपंरपरेत गुरुशिष्याच्या जोड्या प्रसिध्द आहेत. जसे शुक्राचार्य-जनक, राम-लक्ष्मण, दोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य पंरपरा आहे. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुला आहे. पण मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. गुरुंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेणे भरून येते. तेव्हा आपले आपल्या मुखातून आपोआपच शब्द बाहेर पडतात.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती गेवारे आणि प्रणाली मगर यांनी केले तर, आभार सचिन परिहार याने मानले.











