न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १७ जुलै २०१९) :- प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर पुणे येथे आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. गुरुपौर्णिमा हीला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या जीवनामध्ये गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. आपली पहिली गुरू आई असते. गुरूने दिलेली शिकवण आपल्या जीवनात फायदाच देत असते, असे मत मुख्याध्यापिका संगीता लकारे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास उपमुख्याध्यापिका रोहिणी काळे, पर्यवेक्षिका सीमा कुळधरण उपस्थित होत्या. या प्रसंगी सार्थक चव्हाण या विद्यार्थ्यांने अगस्ती ऋषीच्या वेशात येऊन विद्यार्थ्यांना गुरु संदेश दिला आणि श्रीकांत कांबळे या विद्यार्थीने विष्णूचा वेश परिधान करून विद्यार्थ्यांना उपदेशपर गोष्ट सांगितली. सार्थक धडफळे हा द्रोणाचार्यांच्या रूपात व तेजस निम्हण अर्जुनाच्या रूपात येऊन गुरु शिष्य नाट्य संवाद सादर केला. हा संवाद पाहून विद्यार्थी आनंदीत झाले.
कार्यक्रमास खंडू खेडकर, वासंती विभांडिक, कैलास रायते, प्रदीप शिंदे, प्रशांत बुधिहाळ, अमित ओमासे, दिपाली आस्तेगावकर, सतीश लिंबेकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिता पवार व आभार जयश्री देसाई यांनी मानले. कार्यक्रम उत्साहात पार पडला या उपक्रमाचे कौतुक प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे व सहकार्यवाह, नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले.


















