न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०१९) :- माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माजी नगरसेवक व पिंपरी विधानसभा इच्छुक उमेदवार शेखर ओव्हाळ यांनीही अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून, या वाढदिवसाच्या निमित्ताने पिंपरी विधानसभेत राष्ट्रवादीकडून प्रबळ दावेदार असल्याचे जोरदार शक्तीप्रदर्शनही केले आहे.
शेखर ओव्हाळ युवा मंच, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सोमवार (दि. २२ जुलै) रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सायं. ५.०० वाजता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते ”पिंपरीचे शिलेदार” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार असून, याचवेळी जेष्ठ नेते आझमभाई पानसरे यांची ग्रंथतुलाही होणार आहे. यानिमित्ताने शहरातील शिलेदारांचा भव्य गौरव सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील भूषविणार असून, युवा नेते पार्थ पवार, माजी आमदार आण्णा बनसोडे, विलास लांडे, माजी महापौर व नगरसेवक योगेश बहल, मंगला बनसोडे, शहर राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते आदी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शेखर ओव्हाळ यांनी दिली.


















