- पिंपरीत युवक काँग्रेस ची बैठक संपन्न
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०१९) :- पिंपरी चिचंवड शहर जिल्हा युवक काँग्रेस ची बैठक आज पिंपरी येथे एका हाॅटेल मध्ये सकाळी ११:३० वा. पार पडली. यावेळी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव व पिंपरी चिचंवड युवक काँग्रेसच्या नव नियुक्त प्रभारी यांनी कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून या जुलमी सरकार विरोधात आंदोलने करा, असे आवाहन केले.
युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने शहरात राबवण्यात येणा-या युवक काँग्रेसच्या संपर्क अभियानाबाबत सुचना देण्यात आल्या व त्यावरील अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या प्रसंगी बोलताना पवार म्हणाल्या, काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणीची जबाबदारी घेऊन रस्त्यावर उतरून आवाज उठवावा. तसेच नुकतेच उत्तर प्रदेशात झालेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीच्या अटकेबाबत त्यांनी योगी व मोदी सरकारचा निषेध व्यक्त करताना त्या म्हणाल्या, ज्या जमिनीवरुन १० गाेरगरीब आदिवासी बांधवाना गोळ्या घालून ठार करण्यात आले त्या जमिनीचे प्रकरण उत्तरप्रदेश सरकारच्या एका प्रकल्पाशी निगडित असल्याची चर्चा आहे. प्रियांका गांधींना पिडीत कुटूंबांपर्यंत पोहचण्यास अडथळे निर्माण करुन युपीतील भाजप सरकारने वरील चर्चेला बळकटी मिळवून दिली. एका सरकारी प्रकल्पासाठी बळजबरीनेही जमीन या आदिवासी लाेंकाकडुन हडपण्याचा प्रयत्न याेगी सरकार गेल्या कित्येक दिवसापासुन करत असल्याची चर्चा आहे. जर प्रियंका गांधी हत्यांकाडातील पिडीत कुटुंबांना भेटल्या तर याेगी सरकारचा खुनी चेहरा उघड हाेणार आहे. त्यामुळेच याेगी सरकारने प्रियंका गांधीना अटक केली आहे व या जुलमी सरकारला सळो कि पळो करण्यासाठी अधिक आक्रमक पणे युवकांनी पुढे यावे, असे मत व्यक्त केले. पक्षाची संपूर्णपणे जबाबदारी आता युवकांवर आहे. जनतेच्या मनांत असलेल्या अपेक्षासाठी युवकांनी अतोनात प्रयत्न करणे काळाची, देशाची व समाजाची देखील गरज आहे व यासाठी योगदान देताना कसलीही कमी पडता कामा नये, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना पवार यांनी जाणून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, एन एस यू आय चे माजी प्रांताध्यक्ष मनोज कांबळे, प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, सचिन कोंढरे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, चिचंवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष संदेश बोर्डे, जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, करणसिंग गील, गौरव चौधरी, सिध्दार्थ वानखेडे, नियाज शेख, दिपक भंडारी, फारूख खान, अनिल सोनकांबळे, वसीम शेख, स्नेहल गायकवाड, विशाल कसबे आदि पदाधिकारी व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी सचिन कोंढरे, मयुर जयस्वाल, नरेंद्र बनसोडे, मनोज कांबळे, अशोक मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. आभारप्रदर्शन हिराचंद जाधव यांनी केले.


















