न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०७ सप्टेंबर २०२६) :- निगडीतील भक्ती-शक्ती उड्डाणपूल ते पिंपरीतील मोरवाडी चौकादरम्यान मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
पावसाचे पाणी साचल्याने खड्डे दिसत नसून अपघाताचा धोका वाढला आहे. भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी या मार्गावर एक हजारांहून अधिक खड्डे असल्याचा दावा केला आहे.
गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवावेत, वाहतूक कोंडीवर उपाययोजना कराव्यात, दिशादर्शक फलक व वाहतूक पोलिसांची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास ११ सप्टेंबर रोजी निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


















