न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०१९) :- पिंपळे निलख येथील पिंपरी चिंचवड मनपा क्रमांक ५२ प्राथमिक मुले-मुली शाळेत शनिवार (दि. २०) रोजी “दप्तरविना शाळा” या उपक्रमाअंतर्गत “गितमंच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक तुषार कामठे, शाळेच्या मुख्यध्यापिका, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
नगरसेवक तुषार कामठे मुलांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, गाण्याच्या माध्यमातून चांगले परिपाठ झाल्यास शाळेची सुरुवात रोज चांगल्या प्रकारे होईल आणि संगीताच्या माध्यमातून मुलांच्या बौद्धिक क्षमतेत भर पडून नैतिक अधिष्ठान निर्माण होऊन सुसंस्कृत भावी पिढी घडेल, असे कामठे यांनी यावेळी प्रतिपादन केले.