न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असताना शहरात बेरोजगार व सुशिक्षित युवकांची खुप मोठी संख्या आहे. या नवोदित उदयास येणाऱ्या नवयुवकांच्या अनेक समस्या आहेत. या युवकांच्या सुरक्षित भवितव्यांसाठी व त्यांच्या समस्यांवर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. याकरीता मनपाच्या वतीने एक चांगली दूरदृष्टी असणारे ‘युवा धोरण’ आणावे यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने महापौर राहुल जाधव यांना निवेदन देण्यात आले.
या ‘युवा धोरणात’ शिक्षण, क्रिडा, संस्कृती, रोजगार आदि क्षेत्रांचा विशेष अभ्यास करुन त्यांचा या ‘युवा धोरणात’ समावेश करुन यातून शहरातील युवक व विद्यार्थ्यांना अनेक संधी मिळू शकतात. अशा सूचना या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. जर युवकांच्या सुरक्षित भवितव्यांसाठी ‘युवा धोरण’ आपल्या मनपाने आणले तर असे धोरण राबविणारी पिंपरी चिंचवड मनपा ही देशातील पहिली महापालिका ठरले. याकडे महापौरांकडे लक्ष वेधण्यात आले. यावेळी महापौरांनी ‘युवा धोरण’ आणण्या संदर्भात योग्य ते आदेश देऊ असे आश्वासन दिले.
याप्रसंगी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, भाजयुमोचे सरचिटणीस दिपक नागरगोजे, प्रभाग स्वीकृत सदस्य वैशाली खाडे, प्रविण सिंग, अमोल दामले, राहुल शिंदे, दिपक शर्मा, नागनाथ गुट्टे, मच्छिंद्र गिते, अक्षय निकम, अविनाश काळे, संदिप इंडे इत्यादी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.