न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०१९) :- चिंचवड येथील कै. महेश प्रभाकर कोरे यांच्या प्रथम स्मृति प्रित्यर्थ मनिषा कोरे (शिक्षिका ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला चिंचवड) यांनी बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित राजे शिवराय मुलांचे वसतिगृह घेरा पानवडी, (ता.पुरंदर जि. पुणे ) या वसतिगृहास आर्थिक मदत केली.
या वसतिगृहातील अनाथ व गरीब विद्यार्थ्यांच्या अन्नदानासाठी त्यांनी ५ हजार रुपये मदतनिधी दिला. बोधिसत्व प्रतिष्ठानचे सचिव लहू कांबळे यांनी ही रक्कम स्वीकारली.















