न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०१९) :- रोटरी क्लब ऑफ़ चिंचवडच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण खंडागळे तर सचिवपदी प्रवीण गुणावरे यांची निवड करण्यात आली. रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल रवींद्र धोत्रे यांच्या उपस्थिततीत पिंपरी येथे पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
नवनियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे :-
रोटेरियन बाळकृष्ण खंडागळे(अध्यक्ष),रो.मल्लिनाथ कलशेट्टी(आय पीपी),रो. प्रवीण गुणवरे(सचिव),रो. यातीश भट( सह सचिव), ऱो.दीपन समर्थ(नियोजित अध्यक्ष), रो. सीए किशोर गुजर(खजिनदार),रो पराग जोशी(क्लब ॲडमिनिस्ट्रेशन),रो संजय खानोलकर (सर्व्हिस प्रोजेक्ट), रो भूपिंदरसिंग जग्गी (व्होकेशनल संचालक),रो शिल्पागौरी गणपुले( पब्लिक इमेज),रो डॉ.संजीव दात्ये( वैद्यकीय संचालक),रो प्रसाद शेठ(सभासदत्व संचालक),रो गणेश कुदळे(फाउंडेशन डायरेक्टर),रो प्रसाद गणपुले(न्यू जनरेशन),रो.सुरेंद्र शर्मा(क्लब ट्रेनर), रो शुभदा गोडसे(माहिती तंत्रज्ञान),रो शिरीष भोपे(क्रीडा संचालक),महावीर सत्यांना( निधी संकलन),रो राजेंद्र पोफळे( आर्म्स),दीपाली पाटेकर(प्रेसिडेंट नॉमिनी) अशी आहे.
व्यासपीठावर मावळते अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी,महादेवी कलशेट्टी,कविता खंडागळे आदी उपस्थित होते.तसेच पो उपायुक्त नम्रता पाटील,सहाय्यक पो आयुक्त आर आर पाटील,सायबर सेल प्रमुख पो.निरीक्षक विवेक मुगळीकर,पालिकेचे प्रवक्ते शिरीष पोरेड्डी,कामगार नेते सुजित पाटील, सा कार्यकर्ते सुरेश गारगोटे,
दिघंची गावचे सरपंच अमोल मोरे, सा. कार्यकर्ते डॉ गजानन मोरे, मूजीव तांबोळी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी अध्यक्ष खंडागळे म्हणाले की, वर्षभरात अहमदनगरमध्ये २६ गोदान, सामुदायिक विवाह सोहळा, शिशिर व्याख्यानमाला, सायकलॉथॉन, वैद्यकीय व्याख्यानमाला, शहरातील १२ चौकाचे सुशोभिकरण करणे असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
प्रांतपाल धोत्रे म्हणाले की, गरिबांना गोदान करून परिवर्तन आणायचे आहे. या गोदान महायज्ञात योगदान द्यावेत, असे आवाहन करून हॅपी स्कूल, मुलांना टॅब वाटप, एक प्रशस्त रोटरी दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याचे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. सुरेंद्र शर्मा यांनी केले तर आभार रो. प्रवीण गुणावरे यांनी मानले.















