न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०१९) :- शिवविद्या प्रबोधिनी मार्फत आय. ए. एस. पूर्व परीक्षा महाराष्ट्रभर घेण्यात येत आहे. महाराष्ट्रातील १००० विद्यार्थ्यांना एक वर्ष कालावधीसाठी विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या परीक्षेचे आयोजन शिवसेना युवासेना भोसरी विधानसभेमध्ये पूर्व परीक्षेचे आयोजन भोसरीमध्ये करण्यात आले. या परीक्षेसाठी विद्यार्थी मुला आणि मुलींचा भरपूर प्रतिसाद भेटला. ३०० विध्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, कामगार नेते इरफानभाई सय्यद, युवासेना जिल्हा प्रमुख सूरज लांडगे, युवासेना समन्वयक सचिन सानप, भोसरी विधानसभा प्रमुख कुणाल जगनाडे, विधानसभा चिटणीस अमित शिंदे, कुणाल तापकीर, जिल्हा समन्वयक रूपेश कदम, विधानसभा संघटक किशोर शिंदे, हरीश कुदळे, शिवसेनेचे आबा लांडगे, सर्जेराव भोसले, विभाग प्रमुख विश्वनाथ टेमगिरे, योगेश जगताप, दत्तात्रय भालेराव, शारदा क्लास्सेसचे दिगंबर ढोकले यांनी सुपर विजन केले.












