न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०१९) :- त्रिवेणीनगर येथील सरस्वती विद्यामंदिर शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात विद्यार्थिनी शिकते. आज शाळेचा ओपन डे होता. या दिवशी विद्यार्थी आणि पालक दोघेही शाळेत येतात.
पालकांसमोर विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स सांगितला जातो. तिला मागील परीक्षेत कमी मार्क मिळाले. याची माहिती शाळेने सर्वांसमोर तिच्या पालकांना दिली. मार्क कमी पडले म्हणून ती उदास झाली.
‘ओपन डे’चा कार्यक्रम दुपारी अडीचच्या सुमारास झाला. त्यानंतर तिची आई शाळेच्या इमारतीच्या खाली थांबली होती. त्यावेळी तिने शाळेच्या तिस-या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.












