न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०१९) :- भोसरीमध्ये एका कंपनीत काम करणाऱ्या गजानंद होसाळे या अठ्ठावीस वर्षाच्या तरुणाने आपण काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची इच्छा प्रकट केली आहे.
उद्या मंगळवारी (दि. २३) रोजी पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याकडे तो आपला अर्ज सादर करणार आहे. गजानंद होसाळे हा मूळचा कर्नाटकातील बिदर येथील असून सध्या तो भोसरीतील एका कंपनीत काम करतो. होसाळे याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही.















