न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०१९) :- हॉटेलच्या समोर लघुशंका केल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एकाचे अपहरण करून, खून केल्याची घटना पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
हितेश गोवर्धन मूलचंदानी (वय-२४) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. घटनेप्रकरणी रोहित किशोर सुखेना (वय-२६) यांनी फिर्याद दिली आहे.
अमीन फिरोज खान, शाहबाज सिराज कुरेशी, अरबाज शेख, अक्षय भोसले आणि लंगडा अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील काही गुन्हेगारांवर खून केल्याचा गुन्हा दाखल आहे. घटनेप्रकरणी अमीनला ताब्यात घेण्यात आले असून, चारजण फरार आहेत. घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.
मात्र, हितेशचा खून हा प्रशासकीय यंञनेच्या दुर्लक्षामुळे झाला आहे तसेच पिंपरी-चिंचवड शहरात राञी १२ नंतर हाॅटेल बिअर बार चालू राहतातच कसे? असा संतप्त सवाल नागरिकांनी करत आरोपीला कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात हितेशचा मृतदेह पिंपरीतील भाजी मंडई पोलीस चौकी येथे संतप्त नागरिकांनी आणत आरोपींना अटक करून कडक शिक्षेची मागणी केली तसेच जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत मृतदेह नेणार नाही असा पविञा घेण्यात आला होता. माञ पोलिसांच्या मध्यस्थी नंतर मृतदेह नागरिकांनी ताब्यात घेतला आहे.












