न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २४ जुलै २०१९) :- हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र बटालियन अंतर्गत थलसेना शिबिरामध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या राज्यस्तरीय शिबिरासाठी राज्य पातळीवर निवड झाली आहे.
महाविद्यालयातील प्रगती मगर (प्रथम वर्ष वाणिज्य), धनंजय पाटील, प्रदीप साळे (द्वितीय वर्ष विज्ञान) या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनी त्यांचे अभिनंदन केले.















