न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०१९) :- रेल्वे प्रवासी संघ, पिंपरी चिंचवड (पुणे) यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. यात म्हटले आहे की, पुणे-मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणा-या सर्व पासधारक व प्रवाशांना सुचित करण्यात येते की, कर्जत ते लोनावळा दरम्यान दुरूस्तीच्या कारणास्तव खालील गाड्या रद्द केल्या आहेत व काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
१) डेक्कन एक्सप्रेस 11008/11007~~26/07/2019 ते 09/08/2019 पर्यत रद्द आहे, प्रगती एक्सप्रेस 12126/12125~~26/07/2019 ते 09/08/2019 पर्यत रद्द आहे, गंद्दक एक्सप्रेस 11139/11140~~27/07/2019 ते 09/082019 पर्यत रद्द आहे, ४) कोयना एक्सप्रेस 11029/11030~~26/07/2019 ते 09/08/2019 पर्यंत पुणे ते सीएसएमटी दरम्यान रद्द, ५) सहयाद्गी एक्सप्रेस 11023/24~~26/07/2019 ते 09/08/2019 पर्यत पुणे ते सीएसएमटी दरम्यान रद्द, ६) हुबळी LTT 17317/18~~25/07/2019 ते 08/08/2019 पर्यत पुणे ते एलटीटी दरम्यान रद्द, ७) भुसावळ-पुणे-भुसावळ ही दौंड-मनमाड मार्ग चालविण्यात येईल, ८) पुणे पनवेल (प्यासेन्जंर)51318/53317~~26/07/2019 ते 09/08/2019 पर्यत रद्द, ९) नांदेड पनवेल 17614/17613~~27/07/2019 ते 03/08/2019 पर्यत पुणे ते पनवेल दरम्यान रद्द, १०) पनवेल नान्देड हाॅलीडे स्पेशल 07618~~28/07/2019 ते 04/08/2019 पर्यत पुणे ते पनवेल दरम्यान रद्द. हया सर्व गाडया पुणे ते सीएसएमटी / पनवेल/ एलटीटी दरम्यान रद्द असणार आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.











