- रोटरी क्लब चिंचवडतर्फे २९० विद्यार्थीनींची तपासणी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०१९) :- रोटरी क्लब ऑफ़ चिंचवड आणि प्रा. रामकृष्ण मोरे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींसाठी आयोजित केलेल्या मोफत तपासणी शिबिरात २९० मुलींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादीचे युवानेते पार्थ पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीप कदम, रोटरी चिंचवड क्लबचे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे, सहसचिव यतीश भट, वैद्यकीय संचालक डॉ. संजीव दात्ये, दीपन समर्थ, अरविंद गोडसे, डॉ शिल्पागौरी गणपुले, डॉ दीपाली पाटेकर, कविता खंडागळे आदी उपस्थित होते. यावेळी १० पेक्षा कमी हिमोग्लोबिन असलेल्या मुलींना लोहयुक्त गोळ्या देण्यात आल्या.
यावेळी पार्थ पवार यांनी मुलींशी संवाद साधताना शिक्षणासोबतच आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला. अध्यक्ष खंडागळे यांनी रोटरीच्या उपक्रमाची माहिती दिली. डॉ. पाटेकर यांनी ‘संतुलित आहाराचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान दिले. प्राचार्य डॉ.मनोहर चासकर यांनी प्रस्ताविक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिल्पागौरी गणपुले यांनी तर आभार प्रा सुजाता टांक यांनी मानले.











