न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०१९) :- आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ब्लड कॅन्सरग्रस्त दिपक सखाराम सोळंके या मुलावर धर्मादाय उपायुक्त तसेच जिल्हाधिकारी पुणे यांनी मोफत उपचार करण्याचे आदेश बिर्ला हॉस्पिटलच्या संचालकांना दिले असताना देखील त्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवलेली आहे.
याच्या निषेधार्थ शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज दाखले यांनी बिर्ला हॉस्पिटल येथील उपोषण स्थळाला भेट देऊन आरोग्य मंञी एकनाथ शिंदे यांना कारवाईचे निवेदन पाठविले आहे.
यावेळी शिवशाही व्यापारीसंघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले, उपविभागप्रमुख रामदास केंदळे, राहुल शिंफी, डॉ मिलींदराजे भोसले, प्रार्थनाताई कानडे-मिटना, भाग्यश्रीताई म्हस्के, दत्ता गिरी आदी शिवसैनिक उपस्थित होते.











