न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०१९) :- राहुल यांचे पिंपळे सौदागर येथे नाष्टा सेंटर आहे. आरोपींनी बुधवारी त्यांच्या नाष्टा सेंटरवर येऊन भजी खाल्ली. त्याचे पैसे राहुल यांनी आरोपींकडे मागितले. याचा राग धरून आरोपींनी संगनमत करून राहुल यांच्या घरी जाऊन त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत कोयत्याने वार केले आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली.
हे भांडण सोडविण्यासाठी राहुल यांचे मित्र मैलाना शेख आले असता आरोपींनी त्यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण करून कोयत्याने वार केले. ही घटना बुधवारी (दि. २४) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली.
याबाबत राहुल प्रल्हाद झेंडे (वय ३६, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आशुतोष काटे, आतु शेख, महेश जगताप, सलीम पापा शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी महेश जगताप याला अटक केली आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.












