न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०१९) :- महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर २०१९ मध्ये होणार आहेत. या निवडणुकांमध्ये पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणुक लढण्यास इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले होते.
या मुलाखती माजी मंत्री जयवंतराव आवळे, महाराष्ट्र राज्य कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश शर्मा आणि कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे घेणार आहेत.
त्या अर्जांची छाननी करण्यात आली असून अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी (३० जुलै) रोजी सकाळी ११.०० वाजता कॉंग्रेस भवन, शिवाजीनगर, पुणे येथे होणार आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.












