न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०१९) :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्यांनी संधी दिल्याने विधानसभा पुनर्रचनेनंतर पिंपरीचा पहिला आमदार म्हणून निवडून येण्याचा मान मला मिळाला. त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेमध्ये जाणार नसून मी राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांना भेट देण्याचा प्रश्नच येत नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे माजी आमदार आण्णा बनसोडे यांनी दिली.
राष्ट्रवादीचे माजी आमदार आण्णा बनसोडे हे शिवसेनेच्या वाटेवर या वृत्तानंतर पिंपरी विधानसभेत खळबळ उडाली होती. त्यानंतर माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता ती बातमी खोटी, मी राष्ट्रवादी चा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याने शिवसेनेच्या कोणतेही नेत्यांना अद्याप भेटलो नाही,
मी राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहे. राष्ट्रवादीतर्फे घेण्यात येणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखतीसाठी मी जाणार असून, मी राष्ट्रवादी सोडून अन्य कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचा खुलासा अण्णा बनसोडे यांनी केला आहे.











