न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०१९) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने व महाराष्ट्र राज्य रोल बॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने पिंपरी चिंचवड शहर रोल बॉल असोसिएशन यांच्या सहकार्याने माजी महापौर अपर्णा निलेश डोके महापौर चषक राज्यस्तरिय रोल बॉल स्पर्धा २०१९-२० उद्घाटन तुषार हिंगे समिती सभापती चिंचवड महानगरपालिका व अपर्णाताई डोके (माजी महापौर) यांच्या शुभहस्ते प्रबोधनकार ठाकरे मैदान स्केटींग रिंग यमुनानगर निगडी येथे सकाळी अकरा वाजता २७ जुलै रोजी संपन्न झाला.
यावेळी शर्मिला बाबर (अ प्रभाग अध्यक्ष) अश्विनी बोबडे (विधी समिती सभापती) उत्तम केंदळे (नगरसेवक), जितेंद्र पवार (नगरसेवक), राजू दाभाडे (रोल बॉल खेळाचे अध्यक्ष), रफीक इनामदार (सचिव रोल बॉल), पिंपरी चिंचवड शहर आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर उद्घाटनासाठी रज्जाक पानसरे, क्रीडा अधिकारी यांनी यावेळी आभार व्यक्त केले तर, सूत्रसंचालन विश्वास गंगजे ( क्रीडा पर्यवेक्षक) यांनी केले याप्रसंगी राजू कोतवाल, जयश्री भोज, सुभाष पवार, स्पर्धा प्रमुख ज्ञानेश्वर भिसे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये मुलांचे १४ गट व मुलींचे दहा संघ असे एकूण २४ संघ व या संघातील तीनशे खेळाडू यांनी या खेळात सहभाग घेतला. सदर स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने २७ जुलै व २८ जुलै अखेर चालणार आहेत.
२७ जुलै रोजीच्या सामन्यांचे निकाल पुढीललप्रमाणे :-
पुणे ग्रामीण विवी जळगाव जिल्हा (७-४)
संजोग तापकीर – ४ विलास मोरे – ४ गोल
योगेश तायडे – ३
पुणे शहर विवी अकोला जिल्हा (९-४)
गणेश वाडे आदित्य – ५ अमितेश पाटील – ४ गोल
साकेत गणेश वाडे – ४


















