न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना इंद्रायणी व मुळा नदीच्या पात्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे वाढ होत असून नदीकाठी असणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे.
तसेच नदीच्या पात्राजवळ व पुलाच्या ठिकाणी सेल्फी काढण्याचा प्रयत्न नागरिकांनी करून जीव धोक्यात घालू नये असे आवाहन महापौर राहूल जाधव व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पवना, मुळा व इंद्रायणी नदीपात्र दुथडी भरुन वाहत आहे. येत्या काळात आणखी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत व सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पूरनियंत्रण कक्ष कार्यरत आहे.











