न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०१९) :- शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्यावतीने मावळ लोकसभा मधील मावळ, पिंपरी व चिंचवड विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या नागरी समस्या व तक्रारी सोडविण्यासाठी शिव सारथी – भगवा सारथी ही हेल्पलाईन जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली असून या हेल्पलाईनच्या माध्यमातून विभागप्रमुख व शाखाप्रमुख प्रभागनिहाय नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यतत्पर राहणार आहेत.
प्रत्येक विभाग प्रमुख त्याच्या प्रभागातील तक्रारी हेल्पलाईनद्वारे स्विकारतील व मुख्य हेल्पलाईनना पाठवतील. मुख्य हेल्पलाईन (क्र.७७१९९०२९२९) च्या माध्यमातून संबंधित शासकीय कार्यालयातील अधिकारी वर्गाकडे या तक्रारी पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल. या हेल्पलाईनचा शुभारंभ – शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते “मातोश्री” मुंबई येथे करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना उपनेते – रविंद्रजी मिर्लेकर, जिल्हाप्रमुख – गजानन चिंचवडे, शहरप्रमुख – योगेश बाबर, विधानसभा प्रमुख – प्रमोद कुटे, अनंत कोऱ्हाळे, व तालुकाप्रमुख – राजू खांडभोर, भारत ठाकुर, शरद हुलावळे, अंकुश देशमुख, उमेश गोलांडे, रोमी संधू, मदन शेडगे हे पदाधिकारी उपस्थित होते.















