न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०१९) :- |अणुरेणुया थोकडा | तुका आकाशा एवढा || या नामघोषात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरहून शनिवार (दि. २७) रोजी पिंपरीत आगमन झाले. पिंपरीगावातील भैरवनाथ मंदिर येथे पालखी मुक्कामाला होती. विसाव्यानंतर पालखीने आज रविवार (दि. २८) रोजी कामिका एकादशीच्या दिवशी देहुगावाकडे प्रस्थान केले. त्यावेळी भक्तगणांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
या परतीच्या प्रवासात पालखी निगडीत आली असता, ट्रान्सपोर्टनगर येथे विठू भक्त व भारतीय कामगार सेना महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष व कामगार नेते इरफानभाई सय्यद यांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले. पालखी सोहळा प्रमुख व दिंडी प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने वारकर्यांना अल्पोपहार, फळवाटप व फराळवाटप करण्यात आले. स्वागत सोहळ्याला ससंदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे, कामगार नेते इरफ़ानभाई सय्यद, संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

संत तुकाराम महाराजांच्या परतीच्या पालखी प्रवासात व्हीआयपी डामडौल सोडून इरफानभाईंनी साधेपणाने रांगेत उभे राहून महाराजांचे दर्शन घेतले. तुकाराम महाराजांच्या चरणांवर लीन होत, शहरातील समस्या मार्गी लागू दे, राज्यभरात दुष्काळाचे सावट आहे. पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली आहे. राज्यभरातही पाऊस पडून बळीराजा सुखात नांदू दे. महाराजांची कृपादृष्टी शहरावर अशीच राहू दे, अशी पार्थना करीत पालखी सोहळ्याला निरोप दिला. यावेळी नवचैतन्याचा एक अनोखा अनुभव आल्याचेही इरफान सय्यद यांनी बोलताना सांगितले.















