न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०१९) :-पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने व महाराष्ट्र राज्य रोल बॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने पिंपरी-चिंचवड रोल बॉल असोसिएशन यांच्या सहकार्याने माजी महापौर अपर्णा निलेश डोके महापौर चषक राज्यस्तर रोल बॉल स्पर्धा २०१९-२०२० दिनांक २७ जुलै ते २८ जुलै रोजी प्रबोधनकार ठाकरे, स्केटिंग रिंग, यमुनानगर, निगडी येथे संपन्न झाला. सदस्य स्पर्धेचे बक्षीस वाटप तुषार हिंगे सभापती क्रीडा समिती यांच्या हस्ते सायंकाळी ५.३० वा. देण्यात आले.
यावेळी त्यांच्यासोबत राजेंद्र दाभाडे (रोल बॉल अध्यक्ष), संजय कोल्हे (उपाध्यक्ष), रज्जाक पानसरे (क्रीडा अधिकारी), राजू कोतवाल, विश्वास गेंगजे ,ज्ञानेश्वर भिसे (सर्व क्रीडा पर्यावरण), शैलेंद्र पोतनीस, राजेंद्र नागपुरे, शीतल मारणे, चंद गंगावणे, शैलेश खेडकर, सुनील रेणुसे आदी उपस्थित होते, व अशोक तेलंगे व नंदू सदर स्पर्धे करिता लक्ष्मण माने, गेनू जाधव, रवींद्र कांबळे, ऐश्वर्या साठे ,नियोजन आयोजन कामी कामकाज केले. सचिन भोसले संतोष गाडे आनंदा मेमाने दीपक जवळकर कामकाजात मदत केली.












