न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०१९) :- बूथ कमिटी व पक्षसंघटन मजबूत करा, कोणीही नेता पक्ष सोडून गेला तरी कार्यकर्ते त्याच्याबरोबर जाऊ नयेत, यासाठी संघटन महत्त्वाचे आहे, असे युवा नेते पार्थ पवार म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आणि पक्ष बांधणीचे उद्दिष्ट समोर ठेऊन राष्ट्रवादीच्या वतीने प्रभागनुसार बैठका घेण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत रविवारी (दि. २८) रोजी प्राधिकरणातील केरला भवन येथे बैठकीचे आयोजन केले होते, त्यावेळी पार्थ पवार बोलत होते.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रवक्ते फजल शेख, प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक राजू मिसाळ, विशाल वाकडकर उपस्थित होते.












