न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०१९) :- कासारवाडी येथे शंकर मंदिरासमोर पुणे-मुंबई महामार्गावर सर्व्हिस रोडला भांडण सुरु असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सहाजण एकमेकांशी भांडण करत होते.
पोलिसांनी हे भांडण सोडवून त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेत असताना रीना जोन्स खाली पडली. तिला महिला पोलीस शिपाई मांदळे उठवत असताना डॉलर नलावडे या महिलेने मांदळे यांच्या पाठीत मारले. त्यानंतर रीना हिने मांदळे यांच्यावर घरातील चाकूने हल्ला केला. यात मांदळे यांच्या हातावर, पोटावर, पाठीवर, मानेवर मार लागला. ही घटना रविवारी (दि. २८) दुपारी एकच्या सुमारास कासारवाडी येथे शंकर मंदिरासमोर पुणे-मुंबई रस्त्यावर घडली.
महिला पोलीस शिपाई एस बी मांदळे यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार डॉलर अरविंद नलावडे (वय ४५, रा. एम ई एस कॉलनी), रीना डॅनियल जोन्स (वय ४०, रा. कासारवाडी) मारहाणीसह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












