न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०१९) :- मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कागदपत्रात त्रुटी, अबकारी कर व विविध नियमांचे उल्लंघन केल्याने वाहनांची जप्ती करण्यात आली होती. त्याचा कार्यालयात लिलाव करण्यात आला. जप्त केलेल्या व कायदेशीररित्या नोटीस बजावलेल्या एकूण ५१ वाहनांचा लिलाव करण्यात येणार होता. मात्र, त्यापैकी केवळ २४ वाहनांचाच लिलाव झाला.
यातून आरटीओ कार्यालयाला २५ लाख ४ हजार शंभर रुपये मिळाले तर, ७ वाहनामालकांनी १३ लाख ५१ हजार २६८ रुपयांचा कर भरणा करुन वाहने सोडवून नेली. अशा प्रकारे “आरटीओ’ला एक़ूण ३८ लाख ५५ हजार ३६८ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. २० वाहनांना योग्य मूल्य न मिळाल्याने त्यांचा लिलाव होऊ शकला नाही.















