न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०१९) :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई आयोजित पुणे येथील यशवंराव चव्हाण प्रशिक्षण प्रबोधिनी (यशदा) येथे अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा पार पाडली. सदर कार्यशाळेचे उदघाटन महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलन करुन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांचे व महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विक्रांत बगाडे, महामंडळाचे महाव्यवस्थापक डी.एम. झोंबाडे यांचे हस्ते झाले.
यावेळी अमित गोरखे म्हणाले की, समाज प्रगती पथावर न्यायचा असेल तर अधिकारी कर्मचाऱ्यांना सर्व दृष्टीने सक्षम होणे गरजेचे आहे. समाजातील सर्वसामान्य नागरिकाची कोणत्याही कामाची प्रशासकीय अडवणूक करू नये. शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवा. समाजातील अडाणी, अज्ञानी नागरिकांना वेळोवेळी सहाय्य करा. उपेक्षित समाजाच्या पाठीशी त्यांची सावली बनून रहा, असे आवाहन अमित गोरखे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी केले.
प्रास्तावीक करताना झोंबाडे यांनी महामंडळाच्या स्थापनेपासुन सध्यस्थीती बाबत महिती दिली. महामंडळाचे अध्यक्ष अमीत गोरखे यांनी महामंडळातील कार्यपध्दती ही ऑनलाईन लवकरच करणार असुन, महामंडळातील कामामध्ये गतीमानता आणणे तसेच काम करीत असताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आत्मविश्वास वाढविणे अवश्यक असल्याचे विविध उदाहरणसह सांगीतले.
तसेच व्यवस्थापकीय संचालक विक्रांत बगाडे यांनी कर्मचाऱ्यांनी कामकाजात सुसुत्रीतपणा, कार्यतत्परता आणणे बाबत मार्गदर्शन केले. त्यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना स्वताचा परिचय करुन दिला. त्यानंतर तज्ञ व्याख्याते यशदा पॅनल रेवणकर यांचे कार्यालयीन कामाकाजात गतीमानता आणणे व मोटिव्हेशन / प्रेरणा व्याखान झाले. दुपारच्या सत्रात मुकुंद नाडगौडा, पुणे यांचे संगीतातुन ताणतणाव व्यवस्थापन या विषयी व्याखान झाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपमहाव्यवस्थापक नारोळे यांनी केले व आभार जिल्हा व्यवस्थापक एस.एल. मांजरे यांनी मानले.


















