न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०१९) :- हजसाठी जाणाऱ्या यात्रीकरूंचा जनअधिकार संघटना व पिंपरी चिंचवड सलमानी जमात च्या वतीने रविवार (दि. २८) रोजी आकुर्डी येथे सत्कार करण्यात आला.
त्यावेळी हाफिज व मौलाना अश्कार आलम यांनी सर्व हाजींचे मनोबल वाढविण्यासाठी धार्मिक प्रार्थनेद्वारे सुखरूप प्रवास होण्यासाठी प्रार्थना केली. तसेच माजिद शेख, अॅड. सुशीलकुमार डुमणे, नसिम शेख यांनी हजला जाणाऱ्या भाविक भक्तांचे शाल व हार घालुन अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
हजला जाणारे यात्री रियान शेख, साफिया सिराज शेख, इकबाल शेख, फातीमा शेख, सुमुनिसा खान, इकबाल शेख, फातिमा शेख यांचे अभिनंदन करून प्रवास सुखाचा होणेकामी शुभेच्छा देण्यात आल्या व हजला जावुन आपल्या देशामध्ये एकता, अखंडता रहावी यासाठी प्रार्थना करावी, अशी विनंती करण्यात आली.
यावेळी अॅड. बी. के. कांबळे, शैलेश चहाण आदी उपस्थित होते. कार्यकमाचे आभार अॅड. वाजिद खान यांनी केले.












