न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०१९) :- मुलांना शाळेत आणण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून जबर मारहाण करत कोयत्याने वार केले.
ही धक्कादायक घटना सोमवार (दि.२९) रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील पब्लिक स्कूलच्या गेट समोर घडली.
दिलीप कस्तुर देहाडे (वय ४०, रा. विठ्ठलनगर, नेहरुनगर, पिंपरी) असे जखमी पत्रकाराचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी (एमएच/१४/जीसी/३६७७) या रिक्षावरील चालक आणि त्याच्या दोन अज्ञात साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलिस पुढील तपास करीत आहेत












