न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०१९) :- गाडीला धक्का लागला म्हणून चालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दापोडी येथे ही घटना घडली. चालक विलास बबन शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास बबन शिंदे आळंदीहून औंधच्या दिशेने जात असताना त्यांच्या मोटारीला दुचाकीने कट मारण्याचा प्रयत्न केला असता धडक लागली. यावेळी गाडीमालक शहाजान खानदेखील गाडीत होते. यानंतर दुचाकीवरील दोघा तरुणांनी संताप व्यक्त करत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्यांनी रस्त्यावरील दगड उचलून गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून आरोपी अद्याप मोकाट आहेत. भोसरी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.












