न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०१९) :- महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर २०१९ मध्ये होणार आहेत. या निवडणुकांमध्ये पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणुक लढण्यास इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले होते.
या मुलाखती आज मंगळवारी (३० जुलै) रोजी सकाळी ११.०० वाजता कॉंग्रेस भवन, शिवाजीनगर येथे माजी मंत्री जयवंतराव आवळे, महाराष्ट्र राज्य कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश शर्मा, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, अभय छाजेड आणि कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या.
यावेळी पिंपरीमधून मनोज कांबळे, गौतम आरकडे, सुंदर कांबळे, बाबा बनसोडे तर चिंचवडमधून सचिन साठे, संदेश नवले, परशुराम गुंजाळ यांच्या मुलाखती घेण्यात आल्या, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी दिली.















