न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०१९) :- शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास अज्ञात चार इसमांनी प्रवीण यांचे औंध हॉस्पिटलकडून सांगवीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गातून अपहरण केले. आरोपींनी त्यांच्या मोटारीत बसवून प्रवीण यांना कात्रजच्या दिशेने नेले. दरम्यान, आरोपींनी मोटारीत प्रवीण यांना जिवे मारण्याची धमकी देऊन एका महिलेसोबत अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले.
हे व्हिडिओ आणि फोटो आरोपींनी त्यांच्या साथीदारांना पाठवले. त्यानंतर आरोपींनी प्रवीण यांना बाणेर येथील ऑडी शोरूम समोर सोडून दिले. ही घटना शुक्रवारी (दि. २६) रोजी सकाळी साडे आठ ते दहा वाजण्याच्या सुमारास औंध हॉस्पिटल ते बाणेर या दरम्यान घडली.
प्रवीण बाबी मिस्त्री (वय ३२, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलिस पुढील तपास करीत आहेत.















