न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूरोड (दि. ३१ जुलै २०१९) :- एकाच रात्रीत देहूरोड शहरातील मध्यवर्ती असलेल्या बाजारपेठेच्या ठिकाणी उजाला इलेक्ट्रॉनिक्स, रतन मेडिकल, कुमार ड्रेसेस, तसेच संजय मेटल या दुकानात चोरट्यांनी चोरी करून लाखो रुपयाचे मोबाइल तसेच इतर दुकानातून महागडे साहित्य लंपास केल्याची घटना सोमवारी ( ता. ३० जुलै) सकाळी उघडकिस आली. त्यामुळे देहूरोड येथील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडले. आत प्रवेश करून विविध कंपन्यांचे सुमारे लाखो रुपयाचे मोबाइलची चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अधिक चौकशी केल्यानंतर तो आकडा वाढण्याची शक्यता आहे.
चोरीच्या वेळी चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून बाहेर दोघेजण थांबल्याची माहिती उपलब्ध होत आहे. सर्वच चोरट्यांनी आपल्या तोंडाला रूमाल बांधून आत प्रवेश केल्याचे दिसून आले आहे. देहूरोड पोलिसांनी चारही दुकानातील चोरीला गेलेल्या वस्तूंचा पंचनामा सुरु असून पोलीस अज्ञात सीसीटीव्ही कॅमेरे च्या आधारे चोरांचा तपास करत आहेत.















