न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑगस्ट २०१९) :- रहाटणीतील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी, संस्थापक अरुण चाबुकस्वार, मुख्याध्यापिका श्रीविद्या रमेश यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक पैलुंवर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांच्या कार्याची माहिती देताना सांगितले की, “आपल्या झुंजार लेखणीद्वारे सर्जनशील आणि सत्यान्वेशी लेखण करून महाराष्ट्राला प्रभावित करणारे साहित्यसम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे, साम्यवादी विचारसरणीचे होते. चळवळीत काम करतानाच त्यांचा शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर यांच्याशी परिचय झाला. तत्वातर यांच्यासोबत राहून अण्णाभाउंनी लालबावटा कलापथकाची मुंबईत स्थापना केली.” “स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा नारा देणारे लोकमान्य टिळक एक स्वातंत्र्य सैनिकच नव्हते तर ते शिक्षक, समाजसुधारक आणि आणि वकील सुध्दा होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांची मोलाची कामगिरी होती.” असे चाबुकस्वार यावेळी म्हणाले.
चारुशीला पगार यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.











