न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑगस्ट २०१९) :- मंजिरी दातीर या त्यांच्या पतीसोबत कारमधून जात होत्या. ताथवडे येथील जेएसपीएम कॉलेज समोर आले असता मागच्या बाजूने आलेल्या चारचालकाने त्याची कार मंजिरी यांच्या कारला आडवी घातली.
‘तुम्हाला इंडिकेटर देता येत नाही का, आम्ही गाववाले आहोत, तुम्हाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत आरोपी शरद आणि योगेश यांनी मंजिरी आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. २) रोजी दुपारी अडीचच्या सुमारास जेएसपीएम कॉलेजच्या गेटसमोर ताथवडे येथे घडली.
मंजिरी दत्त दातीर (वय ३०, रा. रावेत) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शरद किशोर पवार (वय ३८), योगेश चंद्रकांत पवार (वय १९, दोघे रा. ताथवडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपस करीत आहेत.












