न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑगस्ट २०१९) :- पिंपरी-चिंचवड दर्शन बस सेवेचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आज (शनिवार) निगडीत उद्घाटन करण्यात आले आहे. त्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर राहुल जाधव, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, सुधाकर वारभूवन उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आठवले म्हणाले की, आगमी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना, मित्र पक्षाची युती निश्चित आहे. या दोन्ही पक्षाकडून मित्र पक्षाला १८ जागा दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) ला दहा जागा मिळाल्या पाहिजेत. त्यामध्ये पिंपरी आणि पुण्यातील कॅन्टोमेंटच्या जागांचाही समावेश असेल. याबाबतचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र दिले आहे, अशी माहिती आठवले यांनी दिली.












