न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०१९) :- योगीराज सहकारी पतसंस्था बाणेर यांच्या वतीने देण्यात येणारा २०१९ सालचा योगीराज विशेष गौरव पुरस्कार रविवार (दि. २२) रोजी चिंचवड़च्या विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी आण्णासाहेब जाधव यांना प्रदान करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड शहरात सर्व सुविधायुक्त व गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट विद्यालय निर्माण केल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
भारताचे जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर मा. पालकमंत्री व खासदार गिरीश बापट, खासदार मा श्रीरंग बारणे, मा. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील या मान्यवराच्यां शुभहस्ते जाधव योगीराज विशेष पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.











