न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने महिला सक्षमीकरण व्हावे, या उद्देशाने ‘प्रथम ती’ संकल्पना घेऊन महिलांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत माहिती देण्याकरीता शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेस आ. गौतम चाबुकस्वार, संघटिका उर्मिला काळभोर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
महिलांचे पंच शक्ती संकल्प यामध्ये शिक्षण, सुरक्षा, समता,स्वास्थ्य, आणि स्वावलंबन या विषयांवर प्रमुख वक्त्या आमदार डॉ. मनिषाताई कायंदे तसेच वीणा भागवत, नगरसेविका प्रवीणा मोरस्कर या मार्गदर्शन करणार आहेत. मंगळवार (दि. २४) सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता आकुर्डीतील खंडोबा मंदिर सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनास आ. गौतम चाबुकस्वार, पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, शिवसेना शहर संघटिका उर्मिला काळभोर व पक्षाचे सर्व पदाधिकारी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.















