न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड भोसरी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने नुकतीच अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल ३६ हजार नवमतदारांची नावे वाढली आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर स्थलांतरित, दुबार आणि मृत मतदार वगळण्यात आले आहेत.
सर्वाधिक मतदार हे चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघात ७ हजार ४५४ पुरुष, ६ हजार ६४१ स्त्री व इतर १ असे १४ हजार ९६ मतदार वाढले आहेत. चिंचवडमध्ये दोन लाख ७५ हजार ४८६ पुरुष तर दोन लाख ४१ हजार ३१८ महिला आणि इतर ३२ असे एकूण पाच लाख १६ हजार ८३६ मतदार आहेत.
भोसरी विधानसभा मतदारसंघात १८ हजार ८३५ मतदार वाढले आहेत. यामध्ये १० हजार ७३ पुरुष तर ८ हजार ७५४ स्त्री व इतर ८ अशी नवमतदारांची नोंद झाली आहे. भोसरीत दोन लाख ३६ हजार ८५३ पुरुष तर एक लाख ९५ हजार ६४० महिला आणि २२ इतर असे चार लाख ३२ हजार ५१५ मतदार आहेत.
लोकसभेनंतर पिंपरी विधानसभा मतदारसंघात १ हजार ८२९ पुरुष, १ हजार ६९८ स्त्री असे ३ हजार ५२७ नवमतदार वाढले आहेत. पिंपरीत एक लाख ८४ हजार ७१३ पुरुष तर एक लाख ६६ हजार ५६७ महिला आणि इतर ६ असे एकूण तीन लाख ५१ हजार २८५ मतदार आहेत.















