न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०१९) :- शिवसेना-भाजप युतीची उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे. सेना – भाजपाच्या संयुक्त पत्रकार परिषद युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. आज रात्री युतीचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेचे नेते हे युती होणारच असा दावा करत आहेत.
दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून असा दावा होत असला तरी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरुन अजूनही ठरलेलं नव्हतं. त्यामुळे आता जागा वाटपाचा तिढा कसा आणि कोण सोडवणार हे आज रात्रीच कळेल.
युती होणार की नाही होणार यावर विधानसभा निवडणुकीचं सारं गणित अवलंबून असणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजप युतीची घोषणा ही पितृपक्षानंतर, घटस्थापनेला होईल अशी चर्चा होती. पण आता २४ सप्टेंबरला घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.















