न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०१९) :- उद्योगनगरी चिंचवडमध्ये अमन किया मोटर्स शोरुमचा भव्य शुभारंभ ३० सितंबर २०१९ रोजी पुणे आणि पिंपरी – चिंचवड चे अनेक प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित केला जाणार आहे, अशी माहिती अमन किया मोटर्स चे युवा संचालक अमन देवीचंद अग्रवाल यांनी दिली.
अमन अग्रवाल पुढे म्हणाले की, दक्षिण कोरियाची प्रसिद्ध वाहन कंपनी किया मोटर्सचे शोरुम सुरु करित असून याठीकाणी प्रथमच बहुचर्चित सेल्टोस कार येथे सर्वांना उपलब्ध होणार आहे. या शोरूममध्ये सेल्टोसचे सर्व मॉडेल्स ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. भारतीय बाजारपेठेची सर्व माहिती घेवूनच भारतात सेल्टोस कार लाँच करणत आली आहे. अमन अग्रवाल चिंचवड आणि चाकण मधील एक समाजसेवी आणि उद्योगपती आहेत. चिंचवडमधील हा देशातील सर्वात भव्य आणि सुसज्ज शोरूम असेल. किआ मोटर्स मोटर्स सेल्टोस अनेक स्टाईलिश, आलिशान, इंटिरियर डिझाइन देतात. डिझाइनबरोबरच पेट्रोल आणि डिझेलची इंजिन विविध आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध केली जात आहेत. तसेच यामध्ये आपल्या मनःस्थितीनुसार कारची लाइटिंग बदलू शकतो. अखेर पिंपरी – चिंचवडमधील रहिवासी सेलटोविषयी जाणून घेण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी शोरूममध्ये यावे असे आवाहन अमन अग्रवाल यांनी केले आहे.












