न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०१९) :- फिर्यादी पावसकर हे हिंजवडी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. बुधवारी सायंकाळी ते डांगे चौक परिसरात कर्तव्यावर होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी किरण राठोड हा नो एन्ट्रीतून दुचाकीवरून आला. त्यास पोलिसांनी अडविले. त्यावरून तो वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालू लागला. त्यानंतर त्याने आपला साथीदार विजय शिरसाट याला बालावून घेतले. त्या दोघांनी पावसकर यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली.
‘आमची गाडी अडविण्याची तुझी लायकी नाही. तू कोण लागून गेला, बघून घेतो तुला तू येथे कशी नोकरी करतो. तूझी वर्दीच उतरवितो’, असे आरोपीने म्हटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींनी फिर्यादी पावसकर करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय तुलसीदास शिरसाट (वय ३८, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) आणि किरण सोनूजी राठोड (वय २४, रा. रघनंदन मंगल कार्यालयासमोर, ताथवडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.












