न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०१९) :- सासू मंगल आणि सून आरती या दोघींचे प्राधिकरण, निगडी येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये संयुक्त खाते आहे. २९ डिसेंबर २००६ ते ३१ डिसेंबर २००९ या कालावधीत सासू मंगल यांनी या संयुक्त खात्यावरील ३१ लाख आठ हजार परस्पर काढून घेतले. तसेच काढलेली रक्कम खर्च केली. याचा आरती यांना मानसिक त्रास झाला.
ही घटना प्राधिकरण निगडी येथे घडली. मंगल साहेबराव जगताप (वय ६५) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी सासूचे नाव आहे. आरती दिगंबर जगताप (वय ४३, दोघीही रा. पेठ क्रमांक २४, प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.












