न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०१९) :- २०६ पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदार संघ अंतर्गत २०१९ च्या विधानसभा मतदानामध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणुन SWEEP कक्षाअंतर्गत मतदानाविषयी नागरीकांचे प्रबोधन करणे, मतदार जागृती करणेकरिता विविध नाविन्यपुर्ण उपक्रम राबविणेत येत आहेत.
यामध्ये आज दि. २६-०९-२०१९ रोजी ज्ञान प्रबोधिनी विद्यालय, निगडी येथे EVM तसेच VVPAT मशिनचे प्रात्यक्षिक दाखविणेत आले व मतदानाचा हक्क बजवण्याबाबत शपथ देण्यात आली. यावेळी भरभरुन प्रतिसाद मिळाला.
सदरचा उपक्रम SWEEP कक्ष प्रमुख श्री. सुनिल वाघमारे मतदार नोंदणी अधिकारी २०६ पिंपरी (अ.जा.) विधानसभा यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मुकेश कोळप, श्री. तानाजी सावंत, श्री. सुशांत जोशी तसेच BLO श्री. बोठे, श्री. दामगुडे श्री. जाविर, श्री. शिंदे. श्री. कांबळे, श्री. भालेकर, श्री. साठे यांचेमार्फत प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.















