न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०१९) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण उद्या दुपारी दोन वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहणार असल्याची माहिती दिली आहे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यानंतर शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत यांनी शुक्रवाारी आपण स्वत:हून ईडीच्या कार्यालयात हजर राहून पाहुणचार स्विकारणार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.















